ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोकणातील दापोलीतून मोर्चा संपल्यानंतर भाजपचे किरीट सोमय्या यांचा मोर्चा ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वळाला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा नंबर असल्याचं सांगितले आहे. आज शुक्रवारी पुण्यातील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून मुश्रीफांच्याबाबत केलेल्या तक्रारी विरुद्ध माहिती घेणार आहेत.
ग्रामविकास हसन मुश्रीफ, त्यांचे कुटुंब आणि संताजी घोरपडे कारखाना विरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुणे न्यायालयात तक्रार याचिका दाखल केली होती. कलम 447 आणि 439 कंपनी कायदा आणि तपास आयपीसी/ सीआरपीसी कलम 256 अंतर्गत फसवणूक आणि शेलकॉससाठी कारवाई करण्याची विनंती किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यावर आज किरीट सोमय्या यांनी ट्विट करत यासंदर्भात पुणे आयकर विभागाच्या अधिकार्यांना भेटणार असल्याचे सांगितले आहे. त्यावर पुढील काही दिवसात सुनावणी होणार आहे.