परदेशातून हिंदूत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी येणार : देशातील 25 राज्यातील हिंदू संघटनांचाही सहभाग : हिंदू जनजागृती समितीतर्फे आयोजन
प्रतिनिधी/कोल्हापूर
हिंदू जनजागरण समितीच्यावतीने दहाव्या अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाचे गोव्यात आयोजन केले आहे. 12 ते 18 जून दरम्यान होणाऱ्या या अधिवेशनाला प्रदेशातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून देशातील 25 राज्यातील हिंदूत्वावादी संघाटनाही या अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्रित येणार आहेत. ही माहिती आयोजक प्रा. महावीर श्रीमाळ यांनी पत्रकाव्दारे दिली.
आजवर हिंदू जनजागरण समितीतर्फे नऊवेळा घेण्यात आलेल्या अ. भा. हिंदू राष्ट्र अधिवेशनाला देश-विदेशातून उदंड प्रतिसाद लाभला आहे.
या अधिवेशनातून देशातील 25 राज्यातील तब्बल 200 हिंदूत्वनिष्ठ संघटना संघटीत झाल्या आहेत. आजवर या अधिवेशनात नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, बांगलादेश या देशातून हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या अधिवेशनातून प्रेरणा घेत आजवर देशातील अनेक राज्यात 121 प्रांतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर हिंदू आंदोलने झाली आहे. उद्योगपती परिषद, आरोग्य सहाय्य समिती, राष्ट्रीय पत्रकार मंच आदींची स्थापना या अधिवेशनातून झाली आहे. एक भारत अभियान-कश्मिर की ओर आणि मंदिर-संस्कृती रक्षा अभियान आदी राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमही राबविले आहेत. गोव्यात जूनमध्ये होणाऱया अधिवेशनात हिंदू राष्ट्र आणि इतर विषयांवर चर्चा, व्याख्यान, ठराव, कृती कार्यक्रम होणार आहेत.