‘टायगर नागेश्वर राव’मधून झळकणार
दक्षिणेचा सुपरस्टार रवि तेजा याचा चित्रपट ‘टायगर नागेश्वर राव’मध्ये आता नुपुर सेनन दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वामसी करत आहेत. तर द काश्मीर फाईल्सचे निर्माते अभिषेक अग्रवाल याच्या निर्मितची धुरा पेलत आहेत. टायगर नागेश्वर राव हा चित्रपट तमिळ, तेलगू, मल्याळी, कन्नड आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री क्रीति सेनॉनची बहिण असणाऱया नुपुरला या चित्रपटामुळे मोठी संधी मिळाली आहे. नुपुरने इन्स्टाग्राम अकौंटवर या चित्रपटासंबंधी एक पोस्टर शेअर केले आहे. नुपुरसोबत या चित्रपटात अभिनेत्री आणि मॉडेल गायत्री भारद्वाज देखील दिसून येणार आहे. 2018 मध्ये गायत्रीची एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया युनायटेड कॉन्टिनेंट्स म्हणून निवड झाली होती.
नुपुर लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच्या ‘नूरानी चेहरा’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण संपले आहे. याचबरोबर नुपुरने अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘फिलहाल 1’ आणि ‘फिलहाल 2’ या दोन म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले होते.