तिरुपती
आंध्रप्रदेशात तिरुपतीपासून 85 किमी ईशान्येला शनिवारी मध्यरात्रीनंतर भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार मध्यरात्री 1.10 वाजता भूकंप झाला. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे परिसरात कोणतीही मोठी वित्तहानी किंवा जीवितहानी झालेली नाही. भूकंपमापन विभागाने ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली आहे.