वाढत्या उष्णतेचा परिणाम : अंडेही पाच रुपयांवर स्थिर
प्रतिनिधी /बेळगाव
मागील काही दिवसात चिकनच्या दरात घसरण झाली आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी चिकनचा दर 300 रुपये इतका झाला होता. तो आता 220 ते 240 रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे चिकन खाणाऱयांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना आणि बर्ल्ड फ्ल्यूच्या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका बसला होता. दरम्यान अनेकांनी पोल्ट्रीफार्म बंद केले होते. त्यामुळे चिकनच्या दरात मोठी वाढ झाली होती. चिकनचा दर तब्बल 300 रुपयांवर पोहोचला होता. त्यामुळे सर्वसामान्यांना चिकन खरेदी करणे अवघड झाले होते. मात्र आता पोल्ट्रीफार्म सुरळीत सुरू झाले आहेत. त्यामुळे बॉयलर कोंबडीचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे चिकनच्या दरात काहीप्रमाणात घट झाली आहे.
मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस होत आहे. त्यामुळे वातावरणात गारठा निर्माण होत आहे. त्यामुळे चिकनची मागणी वाढत आहे.
कोरोना काळात पोल्ट्री व्यावसायिक आणि चिकन दुकानदार अडचणीत सापडले होते. तसेच काहींनी कोंबडय़ा फेकून दिल्या होत्या. मात्र आता चिकन विक्रीही सुरळीत सुरू झाली आहे. तसेच 5 रुपयाला एक अंडे अशी विक्री सुरू आहे.
कोंबडय़ांची कमतरता नाही…
वाढत्या गरमीमुळे चिकन खाणाऱयांची संख्या कमी होते. त्यामुळे उष्णतेच्या काळात चिकनचा दर काहीप्रमाणात कमी होतो. सध्या पोल्ट्री व्यवसाय सुरळीत सुरू आहे. त्यामुळे बॉयलर कोंबडय़ांची कमतरता नाही.
– आनंद पाटील (साहाय्यक निर्देशक-कुक्कुटपालन)