जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट
महागडय़ा नंबर प्लेटद्वारे स्वतःची श्रीमंती दाखविण्याचा प्रकार मोठय़ा प्रमाणावर दिसून येतो. स्वतःच्या छंदासाठी केवळ व्हीव्हीआयपी नंबर प्लेटवर कोटय़वधी रुपये खर्च करून लोक स्वतःच्या वाहनाला नंबर मिळवून घेतात. जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट ब्रिटनमध्ये राहणारा अफजल कान्ह या कार डिझाइनरकडे आहे. त्याने 14 वर्षांपूर्वी (2008 मध्ये) ‘एफ1’ हा नंबर सुमारे 4 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. अफजलच्या वेबसाइटनुसार तेव्हापासून आतापर्यंत याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे.
मोटरिंग एक्सपोजर मॅगझीनने याला आतापर्यंतचा सर्वाधिक किमती नंबर प्लेट घोषित केले आहे. अफजलला या नंबर प्लेटसाठी कोटय़वधींची ऑफर मिळाली आहे. परंतु तरीही त्याने त्याची विक्री पेलेली नाही. ब्रिटनमध्ये तसेही नंबर प्लेट विकणे वैध आहे.
जोपर्यंत एखादी मोठी ऑफर मिळत नाही, तोवर ही नंबर प्लेट विकणार नसल्याचे अफजलने म्हटले आहे. नंबर प्लेट सप्लायर वेबसाइट रेजट्रान्सफरर्सवर याची किंमत सुमारे 342 कोटी रुपये ठरविण्यात आली आहे. अफजलने या नंबर प्लेटला स्वतःच्या बुगाटी व्हेयरॉन कारवर लावले आहे.
जगातील दुसऱया क्रमांकाची महागडी नंबर प्लेट एक सिंगल डिजिटल ‘1’ आहे. सईद अब्दुल गफ्फार खौरी यांनी सुमारे 109 कोटी रुपयांमध्ये ही नंबर प्लेट एका लिलावात खरेदी केली होती. 2008 साली अमिरात ऑक्शन कंपनीकडून याचा लिलाव करण्यात आला होता. खौरी हे अब्दुल खालिक अल खौरी अँड ब्रदर्स कंपनी तसेच मिलिपोल इंटरनॅशनल इस्टेटचे सीईओ आहेत.
जगातील तिसऱया क्रमांकाची महागडी नंबर प्लेट दुबईत 73 कोटी रुपयांमध्sय विकली गेली. एका व्यक्तीने चॅरिटी ऑक्शनमध्ये ती विकत घेतली. गाडीचा क्रमांक एए8 असा होता.
2016 साली 64 कोटी रुपयांमध्ये एक नंबर प्लेट विकली गेली होती. ‘डी5’ नंबरला भारतीय उद्योजक बलविंदर साहनी यांनी खरेदी केले होते. आपला लकी नंबर 9 असून ‘डी’ हे अल्फाबेट चौथ्या क्रमांकाचे आहे, त्याला 5 ने जोडल्यास 9 क्रमांक येत असल्याचे साहनी यांनी म्हटले होते.