सिद्धार्थ अन् शिल्पा शेट्टीसोबत झळकणार
सिद्धार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यानंतर आता रोहित शेट्टीच्या ऍक्शन सीरिज इंडियन पोलीस फोर्समध्ये अभिनेता विवेक ओबेरॉयची एंट्री झाली आहे. विवेकने रोहित शेट्टीसोबत इंडियन पोलीस फोर्समधील स्वतःच्या सहभागाची घोषणा करत एक पोस्ट शेअर केली आहे.
या सीरिजमध्ये मी एका सुपरकॉपची भूमिका साकारणर असल्याचे विवेकने म्हटले आहे. तर छायाचित्रात विवेक हा पोलिसांच्या गणवेशात गनने फायर करताना दिसून येत आहे. सध्या या सीरिजचे गोव्यात शूटिंग सुरू असल्याचे समजते.
या सीरिजवर मी अनेक वर्षांपासून काम करत आहे. ही सीरिज सर्व सीमा आणि भाषेचे अडथळे ओलांडणार आहे. या सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम करण्यासाठी अत्यंत उत्सुक असल्याचे रोहितने म्हटले होते. या सीरिजद्वारे रोहित ओटीटीवर पदार्पण करत आहे. 8 पार्टमध्ये तयार होणाऱया या सीरिजला अमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम करण्यात येईल.