महापालिकेकडून आधुनिक पद्धतीची यंत्रोपकरणे खरेदी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील कचऱयाची उचल करण्यासाठी तसेच गटारींची स्वच्छता करण्यासाठी महापालिकेने कोटय़वधीची यंत्रोपकरणे खरेदी केली आहेत. काहींचा वापर केला जात आहे. नव्याने खरेदी करण्यात आलेल्या ट्रक्टर-टेलर माऊंटेड जेसीबीचा वापर करण्यास प्रारंभ केला आहे. विविध ठिकाणच्या गटारींची स्वच्छता करण्यासाठी या नव्या ट्रक्टर जेसीबीचा वापर करण्यात येत आहे.
महापालिकेने अलिकडेच ट्रक्टर-ट्रेलर माऊंटेड जेसीबी आणि मिनी जेसीबी खरेदी केले आहे. नाल्यांची स्वच्छता आणि खोल गटारीतील कचरा काढण्यासाठी भाडेतत्त्वावरील वाहने घ्यावी लागतात. त्यामुळे मनपाला नाला स्वच्छतेसाठी मोठय़ा प्रमाणात खर्च करावा लागत आहे. खोल आणि अरूंद गटारींमधील कचरा काढताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे महापालिकेने अत्याधुनिक पद्धतीची यंत्रोपकरणे खरेदी केली आहेत. ट्रक्टरच्या टेलरला लहान क्षमतेचा जेसीबी जोडण्यात आला आहे. सदर जेसीबीद्वारे खोल गटारी आणि लहान नाल्यातील कचरा काढता येवू शकतो. तसेच काढण्यात आलेला कचरा थेट टेलरमध्ये भरता येवू शकतो. जेसीबी आणि कचरा भरण्यासाठी अन्य वाहने घ्यावी लागतात. दोन वाहनांचा वापर करावा लागतो.
त्यामुळे महापालिकेने जेसीबी जोडलेला ट्रक्टर टेलर खरेदी केला आहे. या यंत्रोपकरणाचा वापर करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. सदर जेसीबी ट्रेलरच्या मागील बाजूस जोडण्यात आला आहे. लहान गटारींच्या ठिकाणी हा जेसीबी वापरणे शक्मय आहे. तसेच अरूंद नाल्यामधील कचरा काढण्यास जेसीबी उपयुक्त ठरणार आहे. सध्या गटारी स्वच्छ करण्यासाठी जेसीबी माऊंटेड ट्रक्टर टेलरचा वापर करण्यास प्रारंभ केला आहे.