विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
वार्ताहर /गुंजी
येथील जागृत देवस्थान श्री माउलीदेवीच्या जीर्णोद्धारित मंदिराचा उद्घाटन सोहळा सोमवार दि. 9 रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. शनिवार दि. 7 रोजी दुपारी 3 वा. कळस व प्रभावळीचे आगमन व गावातून सवाद्य मिरवणूक, रविवार दि. 8 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 धार्मिक विधी, त्यानंतर श्री पीरयोगी मंगलनाथ मठाधीश महाराज किरावळे यांच्या हस्ते कळसारोहण तर विठ्ठल पाटील व बंधू क-नंदगड यांच्या हस्ते दीपस्तंभ पूजन, सायंकाळी 5 वा. सार्वजनिक कुंकुमार्चन, नवचंडी, रात्री 8 वा. आरती व त्यानंतर श्री रामलिंगेश्वर भजनी मंडळ रामनगर यांचे संगीत भजन व गुंजी येथील वारकरी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
सोमवार दि. 9 रोजी सकाळी 8 वा. देवीची महापूजा, प्रार्थना, गाऱहाणे, 10 वा. देणगीदार व मान्यवरांचा सत्कार, त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्री माउलीदेवी मंदिराचे उद्घाटन होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व मंदिराचे उद्घाटन आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. जेतिबा रेमाणी यांच्या हस्ते सभामंडपाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी दानशूर व्यक्ती व देणगीदारांचा सत्कार करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष राजाराम देसाई राहणार आहेत. तालुक्मयातील विविध खात्यांचे अधिकारी, प्रति÷ित नागरिक उपस्थित राहणार आहेत. तरी गुंजीसह किरावळे, संगरगाळी, आंबेवाडी, कामतगे, भटवाडा, भालके के. एच., भालके बी. के., नायकोल, माणिकवाडी, सावरगाळी, शिंदोळी, हारुरी, ढोकेगाळी, गंगवाळी, झाडनावगे, कोकण नावगे, सोनारवाडी, बिंबेगाळी, कुम्रतवाडी, वरकड पाटे आदी गावांसह भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.