ऋणानुबंधाच्या गाठी-पितृ ऋण, पितृदोष, उपाय आणि बरेच काही
( भाग-1 विषय प्रवेश )
कीत्येकदा असे होते की एखाद्या व्यक्तीला आपण बघतो आणि बघता क्षणी ती व्यक्ती आपल्याला आवडायला लागते. अगोदर ओळख नाही, पाळख नाही पण असे वाटते की आपले जन्मोजन्मीचे संबंध आहेत आणि याविरुद्ध असेही होते की दोन सख्खी भावंडे, एकाच घरात वाढलेली, एकमेकांचे तोंडही बघण्याचे टाळतात. बाकी सगळय़ांबरोबर त्यांचे संबंध चांगले असतात पण एकमेकांशी वैरत्व! हेच अगदी वडिलांच्या आणि मुलाच्या बाबतीतही होते. काहीही कारण नाही पण मुलाने बापाबद्दल सूड भावना बाळगल्याची अनेक उदाहरणे आहेत. हे असे का? काय कारण असावे? शास्त्र म्हणते की आपल्या घरामध्ये जन्माला येतात त्यांचे काही ऋणानुबंध असू शकतात. पूर्वजन्मीचा वैरीदेखील पोटचा मुलगा म्हणून जन्माला येऊ शकतो! म्हणजेच या सगळय़ा ऋणानुबंधाच्या गाठी आहेत!!! असो. विषयाची थोडय़ा वेगळय़ा पद्धतीने मांडणी केली. माणसाच्या आयुष्यामध्ये कित्येक वेळेला अनेक संकटे एकदम येतात. व्यवस्थित चालत असलेली नोकरी जाते. व्यवसाय बंद पडतो. नातेवाईकांशी भांडणे होतात. संतती होण्यास विलंब होतो किंवा संतती होत नाही. अशा वेळेला जेव्हा व्यावहारिकदृष्टय़ा काहीही कारण सापडत नाही तेव्हा साहजिकच माणूस ज्योतिषशास्त्राकडे वळतो. बऱयाचदा पत्रिका घेऊन गेल्यानंतर ज्योतिषी सांगतात की तुम्हाला पितृदोष आहे. त्र्यंबकेश्वरला त्रिपिंडी आणि नारायण नागबळी करावा लागेल. अर्थात कित्येक ज्योतिषी पत्रिकेचे नीट अवलोकन न करताच तुम्हाला पितृदोष-सर्पदोष आहे अमूक तिकडे जाऊन ही शांत करा वगैरे सांगतात तो भाग वेगळा. बरं इतके करूनसुद्धा हा पितृदोष कुंडलीतून नाहीसा होतो का? समजा संतती होत नाही म्हणून एका व्यक्तीने अमुक ठिकाणी जाऊन त्रिपिंडी श्राद्ध नारायण नागबली सारखी विधी केले आणि नंतर त्या व्यक्तीला संतती झाली याचा अर्थ पितृदोष गेला असे व्हायला पाहिजे आणि संततीच्या कुंडलीमध्ये पितृदोष निर्माण झाला नसायला पाहिजे. पण असे होते का? कित्येक वेळेला दोन भावंडांपैकी एकाच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे आणि दुसऱयाच्या कुंडलीमध्ये पितृदोष नाही असे होते. दोघांचेही पितर एकच असताना असे का होते? पितृदोष आणि पितृऋण यात फरक काय आहे? किती प्रकारचे पितृदोष असतात? हा फक्त पितृ म्हणजे पित्याकडून असतो का? की आईकडून, बहिणीकडून, मामा वगैरे कडून असू शकतो? या सगळय़ाबद्दल चर्चा करण्याकरता हा लेख आहे.
महा उपायः नोकरी मिळणे ही एक अवघड गोष्ट झाली आहे. स्पर्धेचे युग आहे. मुलाखतीमध्ये सफलतेसाठी पूर्ण तयारीसोबत हा उपायही करून बघा. एका लिंबामधे 4 लवंगा खोचा. खोचताना ‘ओम हं हनुमते नमः’ या मंत्राचा 29 वेळा जप करा.
सोपी वास्तू टिप ः जिन्याखाली प्रमाणपत्रे, कुटुंबाचा फोटो, व्यवसायाची कागदपत्रे ठेवू नयेत. वाढ खुंटते.
प्रा. पं. तेजराज किंकर
मेष
खर्चाला आवर घालण्याची वेळ आलेली आहे. परदेशगमनाकरता प्रयत्न करत असाल तर प्रयत्न यशस्वी होतील. अडकलेले पैसे मिळणे थोडे अवघड आहे. तब्येतीला जपावे लागेल. वैवाहिक सुख उत्तम असेल. व्यवसायासंबंधी व्यवहारात भाग्य साथ देईल. सन्मानप्राप्तीचे योग आहेत.
उपायः श्रीगणेशाच्या चरणी पाच वेलदोडे अर्पण करावेत.
वृषभ
पोटासंबंधी तक्रारी उद्भवू शकतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये वादावादीचे प्रसंग येतील. प्रवासाचे योग बनत आहेत. स्थावर मालमत्तेकरता प्रयत्न कराल. शेअर्समध्ये गुंतवणूक टाळावी. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात. वाहन चालवताना सावध असावे. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल.
उपाय ः हनुमान मंदिरामध्ये बत्ताशांचा नैवेद्य दाखवावा.
मिथुन
आरोग्यासंबंधी हलगर्जीपणा करून चालणार नाही. दुखणे अंगावर काढू नका. धनप्राप्ती उत्तम असेल. कामाकरता प्रवास घडेल. लेखन कार्यात यश मिळेल. छोटय़ा गुंतवणुकीतून लाभ संभवतात. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. अचानक धनलाभाचे योग आहेत. मंगलकार्यात सहभागी व्हाल.
उपाय ः देवीला 21 लवंगांची माळ अर्पण करावी.
कर्क
लहान मोठी दुखापत होऊ शकते. मित्रांकडून निराशा होईल. मोठय़ा भावंडांशी वाद संभवतो. व्यवसायामध्ये यशप्राप्ती करता विशेष प्रयत्न करावे लागतील. प्रेमप्रसंगात यश मिळेल. कौटुंबिक सुख उत्तम असेल. नोकरीमध्ये आशादायक घटना घडतील. वैवाहिक जीवनात आनंद असेल.
उपायः ग्रामदेवतेला खिरीचा नैवेद्य दाखवावा.
सिंह
आरोग्याविषयी सदर सतर्क असाल. आर्थिक फसवणूक होण्याची शक्मयता आहे. एखाद्या घटनेमुळे परिवारातील शांतता बिघडू शकते. प्रवासातून फायदा होईल. मातृतुल्य स्त्रीशी मतभेद होतील. जमिनीचे व्यवहार सध्या टाळावेत. शेअर्ससारख्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
उपायः गाईच्या गोठय़ातील माती जवळ ठेवावी.
कन्या
दूषित पाणी पिल्याने आजार होऊ शकतो. कौटुंबिक सुख उत्तम असेल. धनप्राप्तीचे मार्ग सापडतील. लेखी व्यवहारात सावध असावे. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. प्रेमींना अनुकूल काळ आहे. शेअर्समधून फायदा होईल. मनोरंजनाकडे कल असेल. वैवाहिक जीवनात सुखमय घटना घडतील. मित्रांची साथ लाभेल.
उपाय ः देवीला कुंकूमार्चन करावे.
तूळ
आरोग्याच्या समस्या दूर होतील. पैशांच्या बाबतीमध्ये सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबातील व्यक्तींशी वाद होऊ शकतो. प्रवासाचे योग बनत आहेत. शेअर्ससारख्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. प्रेमींना काळ अनुकूल आहे. गुप्त शत्रूंच्या कारवाया वाढतील. जोडीदाराशी वाद-विवाद होतील.
उपायः गुरुवारी दुपारी बारा ते दीडच्या दरम्यान दत्त दर्शन घ्यावे
वृश्चिक
आरोग्याविषयी तक्रारी सतावू शकतात. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्मयता आहे. लहान भावंडांचे सहकार्य मिळेल. जमिनीविषयक प्रश्न सुटतील. प्रेमप्रकरणात यश मिळेल. नोकरीमध्ये त्रासदायक घटना करू शकते. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात.
उपाय ः तुळशीला दूधमिश्रित पाणी घालावे
धनु
पैशांच्या आणि आरोग्याच्या बाबतीत भाग्यवान असाल. मौल्यवान वस्तूची खरेदी संभवते. कौटुंबिक सौख्य उत्तम असेल. प्रवासातून गाठीभेटी होतील आणि त्यातून फायदा होईल. जमिनीच्या व्यवहारात उत्तम यश मिळेल. शेअर्समध्ये गुंतवणूक टाळा. वैवाहिक जीवनात अप्रिय प्रसंग येतील. उपाय ःओम नमो भगवते नारायण या मंत्राचा जमेल तितका जप करा
मकर
आरोग्य उत्तम असेल. धनप्राप्तीचे संकेत आहेत. घरात मांगलिक कार्य होऊ शकते. आत्मविश्वासात वाढ होईल. धाडसाचे कौतुक होईल. शत्रूंच्या कारवाया बंद होतील. नोकरीमध्ये त्रास संभवतो. वैवाहिक आयुष्यात आनंदी असेल. छोटी मोठी दुखापत होऊ नये म्हणून सावध असावे. मानसन्मानाचे योग आहेत.
उपायः हनुमान मंदिरामध्ये तुपाचा दिवा लावावा.
कुंभ
मित्रपरिवाराकडून मदत मिळेल. दुरून चांगली बातमी कळू शकते. कामाच्या ठिकाणी कष्टाचे प्रमाण वाढवावे लागेल. भाग्याची साथ असेल. धार्मिक स्थळाला भेट द्याल. वैवाहिक जीवनात आनंद असेल. नोकरीतील वातावरण सामान्य असेल. शेअर्समध्ये गुंतवणूक टाळावी. जमिनीचे व्यवहार सध्या करू नयेत.
उपायः भैरवाच्या मंदिरामध्ये वडय़ाचा नैवेद्य दाखवावा.
मीन
त्रास देणारी लहान मोठी दुखणी कमी होतील. धन प्राप्तीकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. कोणालाही उधार देणे टाळावे. कौटुंबिक जबाबदारी जास्त झाल्याने दमछाक होईल. प्रवास टाळावा. सही करताना सावध असावे. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. घाईगडबडीत दुखापत होऊ शकते.
उपाय ः दत्त मंदिरात हीना अत्तर अर्पण करावे.