प्रतिनिधी /म्हापसा
कोविडचा फटका शॅकवाल्यांप्रमाणे वॉटरस्पोर्ट धारकांनाही मोठय़ा प्रमाणात बसला आहे. दोन वर्षानंतर पर्यटक गोव्यात आले आहेत. 31 मे रोजी वॉटरस्पोर्ट बंद न करता आणखी आठ दिवस वाढवून द्यावे जेणे करुन झालेले नुकसान भरुन काढता येईल अशी मागणी वॉटरस्पोर्टवाल्यांनी आपल्याकडे केली आहे. त्यानुसार आपण पॅप्टन ऑफ पोर्टकडे बोलणी केली आहे. त्यांच्या निर्णयानुसार वाढीव दिवस दिले जाऊ शकतात, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
वॉटर स्पोर्ट संघटनेच्या पदाधिकाऱयांनी मंगळवारी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची भेट घेऊन समस्या मंत्र्याकडे मांडल्या. यासाठी मुख्यमंत्री व पॅप्टन ऑफ पोर्टची परवानगी आवश्यक आहे. मुख्यमंत्र्याशी बोलून तोडगा काढणार असल्याची माहिती खंवटे यांनी दिली. पाण्याचा अंदाज पाहून पेरासेलींग व वॉटर स्पोर्ट्ससाठी ते अन्य पाच दिवस मागतात व त्यात ते आपली रोजी रोटी चालवू पाहत असल्यास ते देण्यास काही हरकत नाही. गेल्या दोन वर्षात त्यांचे खूप नुकसान झाले आहे. तसेच शॅकवाल्यांनाही यात कसे सामावून घेता येईल याकडे लक्ष आहे असे मंत्री म्हणाले.