ऑनलाईन टीम/तरुण भारत मुंबई:
प्रसिद्ध संतूरवादक भजन सोपोरी यांचे निधन झाले आहे.गुरूग्राम मधील फोर्टीस हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. खूप दिवसापासून ते आजारी होते. आज गुरुवारी अचानक त्यांची तब्येत खालावली आणि त्यांचे निधन झाले.
मागच्या महिन्यामध्ये पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले होते. त्यापाठोपाठ आलेल्या या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. भजन सोपोरी हे ख्यातनाम संतूर वादक म्हणून ओळखले जात असत.
जगभरामध्ये त्यांच्या संतूर वादनावर प्रेम करणारे चाहत्यांना ते आपले चाहते समजत नव्हते तर कलेचे चाहते समजत असत.
त्यांच्या कलेतील योगदानाबद्ल त्यांना प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय कालिदास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते सुफी घराण्याची संबंधित होते. आपल्या अनोख्या कलाशैलीने त्यांनी सर्व जगाला भुरळ पाडली होती.