नवी दिल्ली इथं आज पाहिलं राष्ट्रीय हवाई क्रीडा धोरण -२०२२ घोषित करण्यात आले. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी यासंबंधीची माहिती दिली.
भारताचा समावेश २०३० पर्यंत जगातल्या सर्वोच्च हवाई क्रीडा आयोजित करणाऱ्या राष्ट्रांमध्ये असेल. हे या धोरणाचं उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्याचबरोबर देशात सुरक्षित, किफायतशीर आणि शाश्वत क्रीडा परिसंस्था उपलब्ध करणे हा देखील या मागचा उद्देश आहे.
नव्या धोरणामध्ये एरोबॅटिक्स, बलूनिंग, ग्लायडिंग, पॅराशूटिंग, पॉवर्ड एअर क्राफ्ट आणि रोटरक्राफ्ट यासह एकूण ११ हवाई क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यामुळे १ लाख नवे रोजगार उपलब्ध होतील, तसेच सध्याच्या १०० कोटी रुपयांच्या महसुलात वाढ होऊन आगामी काळात तो १० हजार कोटी रुपयांवर जाईल असंही शिंदे यावेळी म्हणाले.