सावंतवाडी/ प्रतिनिधी –
आरोस विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा बारावी चा निकाल 100 टक्के लागला आहे. लवू कांता शेळके -80 टक्के गुण मिळवून प्रथम, अंकुश कांता शेळके 78.56 टक्के गुण मिळवून द्वितीय तर मीनाक्षी कृष्णा माणगावकर ने 78 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे आरोस शिक्षण मंडळाचे अध्यक्ष निलेश उर्फ बाळा परब, स्कुल कमिटी चेअरमन हेमंत कामत, संस्था पदाधिकारी, सदस्य, प्रभारी मुख्यध्यापक सदाशिव धूपकर, सर्व शिक्षक, शिक्षतेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे