प्रतिनिधी /धारबांदोडा
धारबांदोडा तालुका मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या योगसत्रात उपजिल्हाधिकारी कार्यालय, मामलेदार, कृषी विभाग, गटविकास अधिकारी कार्यालय व अन्य सरकारी खात्यांचे कर्मचारी सहभागी झाले होते.
योग शिक्षिका निला नरेश बाळवे व गीतांजली गावडे यांनी योगसत्रात मार्गदर्शन केले. तालुक्याचे मामलेदार प्रवीणजय पंडित व अन्य सरकारी अधिकारी उपस्थित यावेळी उपस्थित होते. नियमित योगा केल्याने शरीर सदृढ व मनःस्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते, असे सांगून सर्व सरकारी कर्मचाऱयांनी नियमित योग सराव करण्याचे आवाहन मामलेदार पंडित यांनी यावेळी बोलताना केले.