प्रतिनिधी /वास्को
श्री क्षेत्र कर्की दैवज्ञ ब्राह्मण मठाधिश्वर प.पू. श्री श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती महास्वामीजी यांचे यंदाचे चातुर्मास व्रताचरण श्री दत्त क्षेत्र गाणगापूर येथे होणार आहे.
दैवज्ञ ब्राह्मण मठाधिश्वरांचे हे 37 वे चातुर्मास व्रताचरण असून येत्या बुधवार दि. 13 जुलै ते 10 सप्टेंबर 2022 पर्यंत दोन महिने श्री जगद्गुरू शंकराचार्य मठ क्र. 10, देवल, संगमरोड गाणगापूर कलबर्गी कर्नाटक येथे संपन्न होणार आहे. या व्रताचरणाचे औचित्य साधून ज्ञातीबांधव भगिनीनी उपस्थित राहून महास्वामीजींचे तसेच श्री दत्त निर्गुण पादुकांचे दर्शन घ्यावे असे आवाहन महासंस्थानतर्फे करण्यात आले आहे.