नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ओएनजीसीला कोलंबियात तेलाची विहीर सापडली आहे. सहकारी कंपनी ओएनजीसी विदेश लिमिटेडला तेथे खोदकामादरम्यान विहिरीच्या तळाशी तेल लागल्याची बाब स्पष्ट झाली आहे. कोलंबियात लानोस जवळ ही तेलाची विहीर सापडली असून 20 एप्रिलला 10 हजार 955 फूट खणल्यानंतर 17 फुटी तेलयुक्त वाळू लागली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.