परंपरा जपल्याबद्दल बेळगाव शेतकरी-पंच कमिटीचे आभार
बेळगाव : सोमवारी शहरातील शेतकरी संघटनेच्यावतीने हनुमाननगर जवळील श्री श्री गौळदेव धुपटेश्वर मंदिरात श्री गौळदेव धुपटेश्वराची विशेष पूजा करण्यात आली. यावेळी यंदा पिकानुसार कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडावा, अशी प्रार्थना करण्यात आली. दोन वर्षांपासून हवामानात बदल झाल्याने ऋतू मागेपुढे झाले आहेत. याचा फटका शेतकऱयांना बसत आहे. त्यामुळे पावसाळय़ात पिकविल्या जाणाऱया पिकांना योग्य आणि ऋतूमानानुसार पाऊस पडावा, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी उत्तरचे आमदार अनिल बेनके, श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक रमाकांत कोंडुसकर, शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील यांच्या उपस्थितीत देवाला पावसासाठी गाऱहाणे घालण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत कंग्राळ गल्ली, चव्हाट गल्ली, खडक गल्ली व इतर गल्लीतील नागरिक उपस्थित होते.