ऑनलाईन टिम : मुंबई
काय झाडी..काय डोंगर..डायलॉग फेम बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रच्या राजकारणातील मॅराडोना असल्याचे म्हटले आहे. मॅराडोनासारखी खेळी करून शेवटी गोल करणारे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात राजकिय गोल करणारे मॅराडोना आहेत. असे एका माध्यमात बोलताना आमदार शहाजी पाटील घडलेल्या राजकिय सत्तानाट्याचा एक एक पदर उलघडताना सांगितले.
अधिक वाचा– …तर आम्ही सर्वजण मातोश्रीवर परत जाऊ
शिवसेनेत घडलेल्या राजकिय बंडामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांचा काय झाडी..काय डोंगर..हा डायलॉग खुपच लोकप्रिय झाला. त्यांच्या या डायलॉगमुळे त्यांच्या लोकप्रियेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आमदार शहाजी पाटील यांनी महाराष्ट्रातील राजकिय घडामोडीतील एकेक पदर उलघडून सांगितला. शिवसेनेतील नाराजीनाट्य, राष्ट्रवादीचा वरचष्मा, आणि महाविकास आघडीतील खदखद आपल्या ग्रामिण ढंगात सांगताना त्यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मॅरोडोना असे म्हटले आहे. अर्जेंटिना चा महान फुटबॉलपटू दिएगो मॅरोडोना हा आपल्या वैशिष्ट्यपुर्ण खेळासाठी प्रसिद्ध होता. त्याच्याप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेळी करून राजकिय गोल साधला आहे.