कानूर/वार्ताहर
गेल्या 24 तासात कानूर विभागात मुसळधार पावसाने जोर धरल्यामुळे फाटकवाडी प्रकल्प अंतर्गत येणारे कोल्हापूर टाईपचे बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. पिळणी बंधाऱ्यावर दोन फुटावर पाणी पाणी आहे. तर भोगोली बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे येतील वाहतूक बिजूर मार्गे चालू आहे.
गेल्या 24 तासात या विभागात मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरीवर सरी येत असून आज दुपारनंतरच घटप्रभा नदी पात्र बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. तर साधारण पाचच्या दरम्यान पीळणी बंधारा आणि भोगोली बंधारा पाण्याखाली गेले आहेत. मागील आठ तासापासून 97 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत 1548 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर सांडव्यातून 7,534 पाण्याचा विसर्ग चालू असून भोगोली पिळणी पूर्णतः पाण्याखाली गेले असून गवसे हिंडगाव बंधारा देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : अलमट्टी धरण ५१ टक्के भरले; वारणा, कोयना धरण साठ्यातही वाढ