बांधकाम क्षेत्रातील कंपनी : सदरची गुंतवणूक आगामी सात वर्षात होण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रियल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर्स आगामी सात वर्षांच्या कालावधीत सर्व प्रकल्पांमध्ये पहिल्या टप्प्यात जवळपास 50 कोटी डॉलर्स(3,950 कोटी रुपये) इतकी गुंतवणूक करणार असल्याची माहिती कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली आहे.
मॅक्रोटेक डेव्हलपर्सने नवी मुंबईजवळ पलावा सिटीमध्ये आपल्या 4,500 एकर प्रमुख एकत्रित टाउनशिप प्रकल्पांतर्गत आरएमआय तंत्रज्ञानाच्या आधारे लोढा नेट झिरो अर्बन एक्सेलेरेटेर कार्यक्रमाची सुरुवात करण्याचीही घोषणा यावेळी केली आहे.
पलावा टाउनशिपमध्ये अगोदरपासून जवळपास दीड लाख लोक राहत आहेत, आगामी काळात 20 लाख लोकांचे घर येथे होणार आहे. यासोबतच जागतिक पातळीवर जवळपास 40 टक्के ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन रियल इस्टेट आणि त्यांच्याशी संबंधीत उद्योग जोडले आहेत.
मॅक्रोटेक, लोढा ब्रँडच्या मदतीने संपत्तीची विक्री
कंपनी बांधकाम क्षेत्रावर पूर्णपणे झोकून देत कार्यरत आहे. रहिवासी घरांना मागणी कायम असल्याचे मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक लोढा यांनी सांगितले. एप्रिल ते मे दरम्यान मात्र मागणी काहीशी कमी होती. पुढील काही वर्षात मुंबई व पुणे शहरात रहिवासी व इतर प्रकल्पांच्या उभारणीवर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. इकॉमर्सप्रमाणेच रहिवासी बांधकाम प्रकल्पांचे महत्त्व कोरोना व नंतरच्या काळात वाढले आहे. सामाजिक सुरक्षेसाठी स्वतःचे घर घेण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. मागच्या वर्षी कंपनीने 1400 कोटी रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रात केली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.