विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
टाेप/वार्ताहर
वाठार पेठवडगांव रस्त्यावर एका नामांकीत महाविद्यालयाच्या इचलकरंजीकडे निघालेल्या गाडीतील विद्याथिर्नीना एका माेटर वहान निरिक्षकाने भरपावसात रस्त्यावर उतरवून बसवरती कारवाई केली. या प्रकाराची संबधीत संस्थेच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार केली आहे.
दरम्यान, माेटर वाहन निरीक्षक पेठवडगांव परीसरात गेली दाेन दिवस भर पावसात कारवाई करत सुटले आहेत. मंगळवारी एका नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यावरही कारवाई केली आहे. काल सांयकाळी पाचच्या सुमारास वठार वडगांव राेडवर एका महाविद्यालयाच्या गाडीतील विद्याथिर्नीना राेडवर उतरत माेटर वहान निरीक्षक यांनी आपली गाडी ही उलट दिशेने लावत असंवेदनशीलतेचा कळसच गाठला. या गाडीवर कारवाई करत असताना निदान पाऊस असताना बसमधील विद्याथिर्नीना उतरवणे चुकीचे असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
हे ही वाचा : नगरपरिषदांच्या निवडणुकीला स्थगिती; निवडणूक आयोगाचा निर्णय
अशा प्रकारे विद्यार्थ्यांना गाडीतून उतरवून कारवाई करणे चुकीचे आहे. माेटर वहान निरीक्षकाने आपल्या आधिकाराचा गैरवापर करणे आयाेग्य असुन यांची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. तसेच प्रशासनाने यावर वचक ठेवणे गरजेचे आहे, असे यावेळी बोलले जात होते.