अमृतमहोत्सवीपूर्ती सोहळय़ानिमित्त आयोजन
पणजी / वार्ताहर
गोव्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात अनेक दशके ज्यांनी योगदान दिले आहे, त्या ऍड. रमाकांत खलप यांचा अमृतमोहत्सवी पूर्ती निमित्त
नागरी सत्कार त्यांच्या वाढदिवसाचा योग साधून 5 ऑगस्ट रोजी होणार आहे .त्या अनुषंगाने गुरुवारी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली व तयारीचा आढावा घेण्यात आला.
निमंत्रक दशरथ परब यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी डॉ. गुरुदास नाटेकर,प्रभाकर ढगे, सागर जावडेकर, गुरुदास सावळ,पौर्णिमा केरकर, नारायण महाले, केशव पालयेकर,नितीन कोरगावकर, चित्रा क्षीरसागर अजित नार्वेकर, प्रकाश क्षीरसागर,कालिका बापट, प्रतिक्षा खलप, प्रमोद कारापूरकर,यांनी चर्चेत भाग घेतला.5 रोजी सत्कार सोहळा आयएमबी सभागृहात होणार आहे व या सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ,खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित राहणार आहेत.