वार्ताहर /कणकुंबी
गोल्याळी ग्रा. पं.अध्यक्षपदी सारिका व्यंकट पाटील यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षा तनुजा तानाजी गुरव यांच्या विरोधात दि. 4 जून रोजी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता.
त्यानुसार दि. 15 जुलै रोजी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी धोंडीबा नामदेव गुरव गटाच्या सारिका व्यंकट पाटील तोराळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. एकूण नऊ सदस्यांपैकी सहा सदस्य उपस्थित होते. तनुजा तानाजी गुरव, विद्यमान उपाध्यक्षा धोंडीबाई मारुती धनगर व संतोष कुलम हे तीन सदस्य गैरहजर होते. सारिका पाटील यांनी अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला.त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. सारिका पाटील यांना नामदेव धोंडीबा गुरव, हनमंत कोदाळकर,राणी कांबळे, शिवानी शिवाजी बळजी व गौतमी गणपती कांबळे यांनी पाठिंबा दर्शविला.