प्रतिनिधी / ओरोस
राज्य भरात गाजलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय धान्य घोटाळा प्रकरणातील चार संशयितांची निर्दोष मुक्तता झाली आहे.यामध्ये संतोष अंकुश बांदेकर ५४ रा. माणगाव कुडाळ (तत्कालीन पुरवठा निरीक्षक), भरत नारायण गंगावणे, ६१ रा. पिंगुळी .(तत्कालीन गोदाम व्यवस्थापक), वासुदेव विष्णू शिवगण, ६८ रा. कासार्डे कनकवली, (तत्कालीन गोदाम पालक) या तीन शासकीय कर्मचाऱ्यांसह धान्य दुकानदार अनिल सीताराम खोचरे. ६८ रा. घावनले कुडाळ यांचा समावेश आहे.
कुडाळ येथील शासकीय गोदामातील bpl योजने अंतर्गत तांदूळ आणि गहू मिळून १०,४३,२४८ रुपये किमतीच्या धान्याचा घोटाळा केल्या प्रकरणी या संशयितांवर दोषारोप ठेवण्यात आला होता. २००६ सालि हे प्रकरण घडले होते. शासकीय धान्याची स्वताच्या फायद्या साठी संगनमताने अफरा तफर करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात झालेल्या खटल्याच्या सुनावणीत सबळ पुरावा अभावी चौघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.संशयितांच्या वतीने अड संग्राम देसाई आणि अड अशपाक शेख यांनी काम पाहिले.
Trending
- कला अकादमीच्या नाट्यामंदिरात पुन्हा गळती
- पंचतारांकित नव्हे, सामान्यांसाठी गृहप्रकल्प
- गोवा शिपयार्डमध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी गुप्तचराला अटक
- कोकणची पोरं हुशार ; राज्यात बारावीचा निकाल 93.37 टक्के
- भामट्यांकडून आता वीजबिलाच्या नावे फसवणूक
- मार्कंडेयनगरात बालिकेचा संशयास्पद मृत्यू
- इमारत पूर्णत्व दाखल्यासाठी भरावा लागणार अर्ज क्रमांक एक
- पूरस्थिती निवारण्यासाठी पूर्वतयारी करण्याची सूचना