ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पेट्रोलियम कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 36 रुपयांची कपात केली आहे. दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 2012.50 रुपयांना मिळत होता, तो आता तो 1976.50 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत 1936.50, कोलकातामध्ये 2095.50 तर चेन्नईमध्ये 2141 रुपयांना मिळणार आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.
यापूर्वी जुलै महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये 8.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. तर 1 जूनला 135 रुपयांची कपात झाली होती. अशाप्रकारे मागील दोन महिन्यात सिलिंडरच्या दरात 350 रुपयांहून अधिकची कपात झाली आहे. मे महिन्यात याच सिलिंडरचे दर 2354 रुपयांपर्यंत वाढले होते.
घरगुती गॅस सिलिंडरमध्ये तेल कंपन्यांकडून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. 6 जुलै रोजी घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली होती. सध्या घरगुती वापराचा गॅस सिलिंडर 1053 रुपयांना मिळत आहे.
हेही वाचा : सोनिया गांधींकडून ‘त्या’ तीन आमदारांचे निलंबन