प्रतिनिधी /फोंडा
नागामशिद कुर्टी फोंडा येथे उड्डाणपुलाच्या खाली पार्क केलेल्या पाणीवाहू टॅकरच्या कॅबिनमध्ये एक संशयास्पद मृतदेह आढळला. सदर घटना काल शुक्रवारी रात्री 7 वा. सुमारास उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार उड्डानपुलाच्या खाली पाणीवाहू टाटा 407 टॅकर जीए 01 डब्ल्यू 5759 पार्क करून ठेवला होता. त्याच्या कॅबिनमध्ये सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह असल्याच्या संशयाने फोंडा पोलिसांनी कळविण्यात आले. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार घातपात? की अन्य कारणाने मृत्यू हे शवचिकित्सा अहवालानंतर स्पष्ट होईल.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार सदर मृतदेह एका कामगाराचा असून यलप्पा अशी त्याची ओळख पटलेली होती. त्याचे वय सुमारे 32 असून मूळ बिजापूर येथील आहे, तो आपल्या दोन भावासह शापूर येथे राहत होता. बुधवार 3 रोजी तो शेवटचा दिसला होता. मोहरम सणासाठी गावी जात असल्याची माहिती त्यानी शेजाऱयाला दिली होती. त्यानंतर तो कुणालाच दिसला नव्हता. पोलिसांनी सदर घटना चार दिवसापुर्वी घडल्याचा अंदाज वर्तविला आहे. उड्ढाणपूलाच्या खाली बेकायदेशीरित्या वाहने पार्क करण्याचा अड्डा बनलेला आहे.