वृत्तसंस्था/ कँटरबेरी (ब्रिटन)
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात होणाऱया आगामी कसोटी मालिकेतून दक्षिण आफ्रिकेचा वेगवान डय़ुनेनी ऑलिव्हरने स्नायु दुखापतीमुळे माघार घेतल्याची माहिती क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या प्रवक्त्याने दिली.
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या इंग्लंडच्या दौऱयावर असून अलीकडेच झालेल्या इंग्लंड लायन्स संघाविरुद्धच्या चार दिवसांच्या सरावाच्या सामन्यात खेळताना ऑलिव्हरची धोंडशीर दुखावली. या स्नायु दुखापतीमुळे तो या कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची ही कसोटी मालिका 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान खेळविली जाईल. या मालिकेतील सामने लॉर्डस्, ओल्ड ट्रफोर्ड आणि द ओव्हल या मैदानावर होतील. ऑलिव्हरच्या जागी दुसऱया बदली खेळाडूची घोषणा अद्याप क्रिकेट दक्षिण आफ्रिकेतर्फे करण्यात आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडा सध्या दुखापतीच्या समस्येला तोंड देत आहे. त्याच्या घोटय़ाला दुखापत झाली असून तो आयर्लंडविरुद्ध होणाऱया दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही.
दक्षिण आफ्रिका कसोटी संघ- डीन एल्गार (कर्णधार), इर्वे, जेनसेन, हार्मेर, केशव महाराज, मार्करेम, एन्गिडी, नॉर्त्जे, किगेन, पीटरसन, रेबाडा, रिक्लेटोन, सिपामेला, व्हॅन डेर डय़ुसेन, व्हेरेनी, झोंडो आणि स्टुरमन.