मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात,स्वातंत्र्यसैनिकांना कृतज्ञता-सन्मानपत्रे अनेकांचा पदके, प्रमाणपत्राने गौरव
प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्र्यांनी एकता, आणि सलोखा या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन जनतेला केले आणि त्याशिवाय आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकत नाही, असे सांगितले. जरी आपण शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात चांगली प्रगती साधली असली तरी गोव्याला पूर्ण विकसित, प्रगतशील राज्य बनविण्यासाठी आपल्याला खूप पुढे जावे लागेल, असे ते म्हणाले.
जुने सचिवालय पणजी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात राष्ट्रीय तिरंगा फडकविला. त्यानंतर बोलताना त्यांनी वरील प्रतिपादन केले.
स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण
आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱया ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करून डॉ. सावंत म्हणाले की त्यांच्या प्रयत्नांमुळे आज आपण स्वातंत्र्याची फळे उपभोगत आहोत आणि आपण त्यांचे सतत ऋणी राहिलो पाहिजे. राज्यात आरोग्य, शिक्षण, पर्यटन, उद्योग या क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सरकारने जीएसआयडीसीच्या माध्यमातून राज्यभर विविध विकासात्मक प्रकल्प हाती घेतले आहेत. चांदेल आणि साळ येथील जलप्रकल्पात वाढ करून लोकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, असेही ते म्हणाले.
मिशन स्वयंपूर्णला सहकार्याची गरज
गोव्यातील स्वयंपूर्ण मिशनबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की सर्वांसाठी घरे, वीज, सीवरेज आणि पाणी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहे. सरकार सरकारी यंत्रणेचा वापर करून या कार्यक्रमावर लक्ष ठेवत आहे. त्यामुळे सरकार स्वावलंबी होण्यासाठी वाटचाल करीत आहे, असे सांगून त्यांनी हे मिशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱया लोकांचे आणि इतरांचे आभार मानले. स्वयंपूर्ण मिशन 2.0 यशस्वी होण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षांकडून सहकार्य मागितले आहे.
शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजनांचा लाभ
लोकांच्या कल्याणाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारने दयानंद सामाजिक सुरक्षा किंवा गृहआधार आणि समाजातील उपेक्षित घटकांसाठीच्या विविध योजना राबविल्या आहेत आणि या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. वन कायद्याच्या संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की राज्यातील आदिवासींना पूर्ण अधिकार देण्याचा सरकारचा विचार आहे.
स्वातंत्र्यसैनिकांना कृतज्ञता-सन्मानपत्रे
गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना कृतज्ञता प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय सरकाने घेतला होता, त्यानुसार या सोहळय़ात स्वातंत्र्यसैनिक आणि कुटुंबातील सदस्य किंवा स्वातंत्र्यसैनिकांचे नातेवाईक यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रीमती कविता शैलेश गावकर, घोडके-बाळ्ळी, केपे आणि श्रीमती स्नेहा विश्वास देयकर, काग्याग्गळ, आंबावली केपे यांना अनुकंपा नियुक्तीपत्रेही देण्यात आली.
अनेकांचा पदके, प्रमाणपत्राने गौरव
उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस कर्मचाऱयांना पदके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली, त्यात केंद्रीय गृहमंत्री पदक जिंकणारे उपअधीक्षक एडविन कुलासो, केंद्रीय गृहमंत्री पदक जिंकणाऱया श्रीमती इझिल्दा डिसोझा उपअधीक्षक, प्रबोध शिरवईकर, डीवायएसपी पोलीस पदक, सचिन लोकरे तसेच पीआय तपास केंद्रीय गृहमंत्री पदक जिंकणारे पोलीस रवींद्र देसाई, पोलीस पदक लाडू गावस एएसआय, अविनाश नाईक पीसी, पंतप्रधान जीवन रक्षण पुरस्कार श्रीकृष्ण आर. पर्रीकर, अग्निशमन आणि आपत्कालीन स्थानक अग्निशमन अधिकारी यांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक, कु. मिनाक्षी अनंत कुबल, प्लाटून कमांडर, होमगार्ड यांना राष्ट्रपतीं होम मेडलने सन्मानित करण्यात आले. श्रीमती नयन दिपू वेलिंगकर लेडी होमगार्ड, गृहरक्षक, रक्षक आणि गुणवंत सेवेसाठी नागरी संरक्षण पदक, भरत पाटील, अध्यक्ष, बीजेएस, गोवा राज्य, (शांतिलाल मुत्था फाऊंडेशन) शिक्षण यांना प्रशंसा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शेख इस्माईल ड्राफ्ट्समन यांना प्रशंसा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
दोन पुस्तकांचे प्रकाशन
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माहिती व प्रसिद्धी खात्याने काढलेल्या ’मार्टियर्स ऑफ गोवा’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. भारतकर हेगडे देसाई प्रति÷ान-गोवा यांना जागतिक वेबवर ‘ओ भारत’ पेपर्सची डिजीटल आवृत्ती लॉन्च केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. भारतकारांच्या निवडक संपादकीयांच्या दोन खंडांचे लोकार्पण करण्यात आले.
सुरवातीस मुख्यमंत्र्यांनी संचलनाची पाहणी केली. वीजमंत्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर, महसूलमंत्री आतानासियो मोन्सेरात, विरोधी पक्षनेते मायकल लोबो, खासदार विनय तेंडुलकर, अ?Ÿडव्होकेट जनरल डी. पांगम, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, श्रीमती जेनिफर मॉन्सेरात, मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, महापौर रोहित मोन्सेरात, डीजीपी जसपाल सिंग, सरकारचे सचिव, एचओडी, वरि÷ सरकारी अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, प्रति÷ित नागरिक, सभोवतालच्या शाळांतील विद्यार्थी या कार्यक्रमात उपस्थित होते.