►बेळगाव प्रतिनिधी
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने शहरामध्ये सर्वत्र उlसाहाचे वातावरण होते. शहरातील अनेक मंडळे दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम दरवर्षी करत असतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे हि परंपरा खंडीत झाली होती. मात्र यंदा विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तरुणांनी अनेक थर करत दहिहंडी फोडली आणि आनंद घेतला.
कॅम्प येथील मेहतर समाज सुधारणा मंडळाचे महर्षि श्री वाल्मिकी मंदिराच्यावतीने दहिहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दहिहंडी फोडण्यासाठी तरुणांनी ही आपला सहभाग दर्शविला. विविध मंडळांनी भाग घेवून हंडी फोडून आपला जल्लोष यावेळी व्यक्त केला. गवळी गल्ली कॅम्प येथील युवक मंडळाने ही दहिडंडी आयोजित केली होती. त्या ठिकाणीहि युवकांनी मोठ्या उत्साहात दहिहंडी फोडून कृष्ण जन्माष्टमी साजरी केली.
तेलगु कॉलनी-कॅम्प येथील जयदुर्गा युवक मंडळाने हि दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याठिकाणी स्थानिक मंडळांसह इतर भागातील मंडळांनीहि भाग घेवून दहिहंडी फोडली. शहरातील मेणशी गल्ली आणि कामत गल्ली येथेहि दहिहंडी आयोजित करण्यात आली होती. मोठ्या उत्साहात तरुणांनी या कार्यक्रमात भाग घेतला आणि जल्लोष करत विविध मंडळांनी दहिहंडी फोडण्याचा आनंद घेतला. याचबरोबर शहरामध्ये इतर ठिकाणीहि दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. रात्री उशीरापर्यंत काहि ठिकाणी दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू होता.
दहिहंडी असल्यामुळे तरुणांबरोबरच बालचमुहि मोठ्या उlसाहाने त्या ठिकाणी उपस्थित होते. काहि ठिकाणी तरुणींनीहि आणि बालचमुंनी दहिहंडी फोडण्यासाठी भाग घेतला होता. तर मंडळाचे कार्यकर्ते थर केलेल्या गोविदांवर पाण्याची फवारणी करताना दिसत होते. गोविंदा रे गोपाळाच्या जयघोषात दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला.