प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून शनिवार दि. 20 रोजी पिरनवाडी आणि मच्छे विभागातील लक्ष्मीनगर येथील उच्च प्राथमिक शाळा, आदर्श मराठी शाळा मच्छे व पिरनवाडी येथील उच्च प्राथमिक मराठी शाळा आणि हुंचेनहट्टी येथील उच्च प्राथमिक मराठी शाळांमध्ये युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी निर्माण केलेली आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, बाग पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले. पिरनवाडी शाळेत झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण पाटील यांनी केले तर प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक एल. बी. तळवार यांनी केले.
कार्यक्रमाला युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, सुधीर हावळ, माजी जि. पं. सदस्य रमेश कण्णावर, माजी ग्रा. पं. अध्यक्ष महादेव मंगणाकर, युवा समितीचे उपाध्यक्ष सचिन केळवेकर, समितीचे जे÷ कार्यकर्ते कृष्णा अनगोळकर, केदारी करडी, सागर कणबरकर, गजानन छप्रे, पप्पू लोहार, प्रशांत नांदोडकर, अमोल लाड, मोहन वसुलकर, पार्थ वाडकर, बजरंग धामणेकर, नारायण मुचंडीकर, इम्रान मुजावर, गणेश आपटेकर, ओंकार आपटेकर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.