प्रवाशांना होतोय त्रास : लक्ष देण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा मार्गावरील पथदीप बंद असल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. येथे पथदीप बसवावेत, अशी मागणी वारंवार करण्यात आली आहे. मात्र, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत आहे. या रस्त्यावरील पथदीप बंद अवस्थेत असल्यामुळे येथील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तातडीने हे पथदीप बसवावेत, अशी मागणी होत आहे. यापूर्वीही हिंडलगा येथे पथदीपांची समस्या निर्माण झाली होती. परिणामी न्यायालयातही याची तक्रार केली होती. आता पुन्हा या ठिकाणचे पथदीप बंद अवस्थेत असल्यामुळे समस्या निर्माण होत आहे. रेसकोर्स परिसरात बिबटय़ाचे वास्तव्य असल्यामुळे हिंडलग्याला जाणाऱया नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे हिंडलगा रोडवरील पथदीप तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे