जुगाराच्या निमित्ताने गोरगरिबांना शाहूपुरी पोलिसांनी छळले
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात बेकायदा धंदय़ांचा उतमात सुरुच आहे. मटक्याने गोरगरिब व मध्यमवर्गीयांचे ….. तोडला आहे. दरम्यान भस्मासुराला माफी करत किरकोळ जुगार अड्डय़ांवर कारवाई करत पोलीस अधिक्षकांसमोर छाती बडवणाऱया अधिकाऱयांनी हप्त्याला बांधील असलेल्या मटक्यावर कारवाई करावी. तसेच पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी डोळे उघडून हप्ते विरहीत कारवाई आणि हप्ते रहित कारवाई यांच्यामध्ये फरक करावा. शहरात बोकाळलेला मटका रोखण्यात पोलिसांना अपयश आले आहे. हे अपयश लपवण्यासाठी सातारा पोलिसांकडून किरकोळ कारवाया होत आहेत. यामध्येच आकाशवाणी झोपडपट्टीमध्ये एक कारवाई दाखवून शाहुपुरी पोलिसांनी ऊर बडवला आहे.
झालेली हकीकत अशी की, दि. 16 रोजीपासून सातारा पोलिसांनी अवैध धंद्या विरुद्ध कारवाईची जोरदार मोहिम उघडली आहे. मात्र यामध्ये शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैध दारुधंदे, जुगार अड्डय़ांवरच फक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शाहुपुरी पोलिसांनी 1 लाख 24 हजार 280 रुपये किंमतीचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त केला. दुसऱयाच दिवशी 2 लाख 10 हजार 620 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तिसऱया दिवशी 84 हजार 834 रुपये किंमतीचा विदेशी मद्याचा (दारुचा) माल वाहतुकीदरम्यान सापळा लावून पकडला. दि. 26 रोजी 37 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून 7 जणांवर ही चौथी कारवाई केली आहे. यामध्ये फक्त आतापर्यंत पोलिसांनी दारुधंदे व जुगार अड्डय़ांवरच कारवाईचा बडगा उगारल्याचे दिसून येत आहे. मात्र मटका चालकांना अभय दिल्याचे दिसून येत आहे.
मात्र अशाच प्रकारच्या धडाकेबाज कारवाया मटकेवाल्यांवर होताना दिसून येत नाहीत. आतापर्यंत मटक्यामुळे अनेक गोरगरिबाचे संसार उघडय़ावर आले आहेत. मात्र तरी सुद्धा पोलीस अधिकारी बोकाळलेल्या मटकेवाल्यांवर कारवाईचा बडगा का उगारत नाहीत ? असा प्रश्न आता सातारकरांना पडू लागला आहे. शहरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या मटक्यावर पोलीस प्रशासन कारवाया करत नसल्याने दोघांमध्ये सोटेलोट असल्याचे निष्पण होत आहे. पोलीस अधिकारी बेकायदा दारु व जुगार अड्डय़ांवर कारवाई करुन पोलीस अधिक्षकांची शाबासकी मिळवून घेण्यात धन्यता मानत आहेत. मात्र हप्तेखोर मटक्यावर कारवाई कधी करणार असा सवाल सातारकर पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांना विचारत आहेत.
पोलिसांना मटक्याची चव गोड?
शहरात विविध अवैद्य धंद्यांचा विळखा पडत असताना पोलिसांकडून यावर प्रतिबंद करण्यासाठी जोरदार कारवाया सुरु आहेत. मात्र अवैद्य दारु व्यावसायिक व छोटे-मोठे जुगार अड्डय़ांवर कारवाई करत पोलीस अधिक्षकांच्या शबासकीची थाप मिळवण्यासाठी अधिकाऱयांमध्ये चुरस सुरु असल्याचे दिसत आहे. मात्र राजरोसपणे सुरु असलेले मटका व्यावसायिक पोलिसांना दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे मटकची चव पोलिसांना गोड असल्याच्या चर्चा साताऱयात रंगू लागल्या आहेत.