महिंद्राचे नवीन इलेक्ट्रिक तीन चाकी मालवाहू वाहन सादर
बेंगळूरः
महिंद्रा समूहाचा एक भाग असलेल्या महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडने नवीन इलेक्ट्रिक तीनचाकी मालवाहू वाहन (कार्गो) ‘झोर ग्रँड’ सादर केले आहे. कंपनीच्या मते, बंगळूरमध्ये या वाहनाची किंमत 3.60 लाख रुपयांपासून सुरू होते. मॅजेन्टा ईव्ही सोल्यूशन्स, ईव्ही नाउ, येलो ईव्ही आणि जिंगो यासह विविध लॉजिस्टिक कंपन्यांसोबत करारांतर्गत महिंद्राने या वाहनासाठी 12,000 हून अधिक बुकिंग आधीच केले आहे, असे कंपनीने सांगितले आहे.