ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कोरोना लसीनंतर सीरम इन्स्टिटय़ूटने गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस आणली आहे. उद्या (दि.1) ही लस लाँच करण्यात येणार आहे. गर्भाशय कर्करोगावरील ही पहिलीच स्वदेशी लस असेल.
अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गर्भाशय कर्करोगाच्या रुग्णांसाठी सीरमने क्वाड्रिव्हॅलंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस ही पहिली स्वदेशी लस विकसित केली आहे. 12 जुलैला डीसीजीएने या लसीला परवानगी दिली होती. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया आणि बायोटेक्नॉलॉजी विभाग 1 सप्टेंबर रोजी ही लस लाँच करणार आहे.
सुरुवातीला ही लस फक्त 9 ते 14 वयोगटातील मुलींना दिली जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे हा कर्करोग होण्याचा धोका टाळला जाऊ शकतो. या लसीचे मूल्य किती असेल हे अद्याप समोर आलं नाही. डिसेंबर 2022 पर्यंत सीरम या लसीचे 1 कोटी डोस तयार करणार आहे.
अधिक वाचा : गणेशोत्सव काळात पुण्यात दारूबंदी