प्रतिनिधी / बेळगाव : किल्ला येथे बिबट्या सदृश प्राणी दिसल्याने किल्ला येथील प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याचे वृत्त समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाले. परंतु हे वृत्त पूर्णपणे चुकीचे व कोणताही आधार नसलेले होते. बुधवारी सकाळपासून या ठिकाणी सुरळीत पद्धतीने वाहतूक सुरु होती. त्यामुळे कोणीही घाबरून जावू नये, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले. मंगळवारी दुचाकीचा अपघात झाल्याने याठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने बंद करण्यात आली होती. परंतु चुकीच्या वृत्तामुळे किल्ला परिसरात दहशत पसरली. परंतु हे वृत्त चुकीचे असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
Trending
- पुदुच्चेरी ते मुंबईपर्यंत सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी
- आरसीबीचा प्ले ऑफमध्ये प्रवेश
- पाचव्या टप्प्यात 49 जागांसाठी 695 उमेदवार
- गॅसचा भडका उडून वृद्ध दाम्पत्य जखमी
- पंजाबविरुद्ध आज हैदराबादचे दुसरे स्थान पटकावण्याचे लक्ष्य
- ‘बर्निंग बस’ दुर्घटनेत 10 भाविकांचा मृत्यू
- राजस्थान रॉयल्सचा मुकाबला आज ‘केकेआर’शी
- कॅम्प येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाला सुरुवात