The sand sculpture is shedding sad tears–
आरवली येथील वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर विघ्नहर्त्या गणरायाचे वाळूशिल्प साकारलय. हे वाळूशिल्प विशेष लक्षवेधी ठरतंय . त्याचं कारण म्हणजे ,आजच्या आधुनिक युगात गणेश पूजनासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांचे प्रमाण वाढताना दिसतंय. पण , या मुर्त्या विसर्जन करूनही पाण्यात विरघळत नाहीत तर त्या तशाच दुसऱ्या दिवशी किनाऱ्यावर येतात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांमुळे पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होतो. आणि हेच दाखवून देण्यासाठी युवा वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी ”विसर्जन कि विटंबना ” या नावाने एक वाळूशिल्प साकारलय. या वाळूशिल्पात विघ्नहर्त्याच्या मूर्तीची विसर्जनानंतरही कशी विटंबना होते हे त्यांनी दाखवून दिलंय.त्यामुळे अश्रू ढाळणाऱ्या विघ्नहर्त्याचे हे वाळूशिल्प श्रद्धेच्या नावाखाली मूर्तीची विटंबना करणाऱ्या मानवाच्या डोळ्यात एकप्रकारे अंजनच घालतंय !
सावंतवाडी / प्रतिनिधी