दिल्लीतील कार्यालयात रहावे लागले हजर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी काँग्रेसचे कर्नाटकातील प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची मनी लॉन्ड्रिंगच्या एका प्रकरणी चौकशी केली आहे. 60 वर्षीय काँग्रेस नेते शिवकुमार सोमवारी दुपारी 12 वाजता दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात पोहोचले होते.
कथित स्वरुपात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमविल्याप्रकरणी सीबीआयकडून नोंद 2020 मधील एका गुन्हय़ाची दखल घेत ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या एका अन्य प्रकरणात मागील आठवडय़ात शिवकुमार यांना समन्स बजावला होता. सीबीआयने 74.93 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी शिवकुमार आणि त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला होता.