क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक शिक्षणखाते बेळगाव यांच्या वतीने तालुकास्तरीय हॅन्डबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बालिका आदर्शने कॅन्टोन्मेंट संघाचा पराभव करुन विजेतेपद पटकाविले.
सी.पी.एड मैदानावर घेण्यात आलेल्या प्राथमिक गटात बालिका आदर्श संघाने उपांत्य फेरीत गोमटेश प्राथमिक संघाचा 6-0 अशा फरकाने तर कॅन्टोन्मेंटने भरतेशचा 2-1 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात बालिका आदर्शने कॅन्टोन्मेंन्ट मराठीचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव करुन विजेतेपद पटकावला. या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी पंच म्हणून नागराज भगवंतण्णावर, बजंत्री, बापू देसाई, जयसिंग धनाजी, नितीन नाईक यांनी काम पाहिले. बेळगांव शहर क्रीडा शिक्षणअधिकारी जे. बी. पटेल, आर. पी. वंटगुडी व सी. आर. पाटील या प्रंसगी उपस्थित होते. या संघाला शाळेचे चेअरमन जी.एन. फडके व मुख्याध्यापक एन.ओ. डोणकरी यांचे प्रोत्साहन तर शाळेचे क्रीडा शिक्षक उमेश बेळगुंदकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.