पुणे / प्रतिनिधी ः
केंद्रीय अर्थमंत्री ’निर्मला सीतारामन या पुणे दौऱयावर असून, यादरम्यान ’लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी’चे पुणे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव यांनी बुधवारी त्यांची भेट घेत त्यांचा स्वागतपर सन्मान केला.
नवीन सहकार मंत्रालय स्थापनेमुळे सहकार क्षेत्राला एक नवीन बळ मिळाले आहे, अशा भावना व्यक्त करीत ‘लोकमान्य’तर्फे त्यांचे अभिनंदनपर आभार मानण्यात आले. यानिमित्ताने सीतारामन यांना आठवण म्हणून ‘लोकमान्य सोसायटी’कडून लोकमान्य टिळकांची प्रतिमा भेट देण्यात आली व त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते.