बेळगाव प्रतिनिधी – शुल्लक कारणावरून कॅम्प येथील एका मुलावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. सोमवारी रात्री अनंतशयन गल्लीजवळ हि घटना घडली असून या घटनेनंतर काहि काळ तणाव निर्माण झाला होता. फरान धारवाडकर (वय 15) असे जखमी मुलाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतर वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोटारसायकलवरून जाताना तरुणांच्या दोन गटात अंबाभुवनजवळ झालेल्या वादावादीनंतर हि घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी, मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी, खडेबाजारचे ए सीपी ए.चंद्राप्पा खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर आदी अधिकार्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला धाव घेतली. जखमी मुलाची भेट घेऊन घटनेची माहिती घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते. हा हल्ला कोणी केला? याचा रात्री उशिरापर्यंत उलगडा झाला नाहि. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.
Trending
- हिंदूत्व विरूद्ध पुराणमतवाद अशी ‘कोल्हापूर’ची लढत; ‘तरूण भारत संवाद’च्या मुलाखतीमध्ये महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांची स्पष्टोक्ती
- कोल्हापूर दौऱ्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी अमित शहांनी लावल्या ‘जोडण्या’
- उद्धव ठाकरेंचे वेत्ये येथे जंगी स्वागत !
- आफ्रिकेत जाऊन प्रचार करा ; मतेही आयात करा
- शिवाजी पार्कचा 3 कोटीचा विकास निधी पळवणाऱ्यांना जाब विचारावा : राजू लाटकर
- आमचं ठरलं म्हणूनच खासदार झालात; पण गेल्या पाच वर्षात काय दिवे लावले?
- भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स मध्ये निवड
- साधना शिबिर व श्री माधवनाथ महाराज पुण्यस्मरण दिनाचे औचित्याने शाहू छत्रपतींनी दिली भेट