समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन
वृत्तसंस्था /लखनौ
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणून अखिलेश यादव यांची सलग तिसऱयांदा निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी अन् पक्षाचे वरिष्ठ नेते रामगोपाल यादव यांनी सप राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यांची बिनविरोध स्वरुपात पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाल्याची घोषणा गुरुवारी केली आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणून अखिलेश यांची 1 जानेवारी 2017 रोजी पहिल्यांदा निवड झाली होती. पक्षसंस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या जागी अखिलेश हे पक्षाध्यक्ष झाले होते. तेव्हा अखिलेश यांचा स्वतःचे काका शिवपाल यादव यांच्यासोबत पक्षावरून वाद सुरू होता.
त्यानंतर ऑक्टोबर 201 7मध्ये आगरा येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यांची पुन्हा एकदा सर्वसंमतीने पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यावेळी पक्षाच्या घटनेत बदल करत अध्यक्षांचा कार्यकाळ तीन वर्षांवरून वाढवत 5 वर्षे करण्यात आला होता. ऑक्टोबर 1992 मध्ये स्थापन समाजवादी पक्षाचे अध्यक्षपद आतापर्यंत यादव कुटुंबाच्या सदस्याकडेच राहिले आहे. अखिलेश यादव यांच्यापूर्वी मुलायम सिंह यादव हेच पक्षाचे अध्यक्ष राहिले होते.