उत्तरपत्रिकेतील उत्तर पाहून शिक्षक अवाप्
लोक विवाहावेळी अत्यंत आनंदी असतात. याचबरोबर इतरांच्या विवाहसोहळय़ात सामील होऊन लोक स्वतःचा आनंद व्यक्त करत असतात. परंतु विवाहाची नेमकी व्याख्या काय हे कुणीच ठरवू शकत नाहीत. सध्या सोशल मीडियावर एक असे छायाचित्र व्हायरल होत आहे, जे प्रचंड लोकप्रिय ठरले आहे. यात एका विद्यार्थ्याने विवाहाची लिहिलेली व्याख्या पाहून सर्वांच्याच चेहऱयावर हास्य उमटत आहे.
या छायाचित्राला अनेक ट्विटर युजर्सनी शेअर केले आहे. एका उत्तरपत्रिकेत एका विद्यार्थ्याने विवाहाची व्याख्या लिहिली आहे. विद्यार्थ्याने विवाहाची मांडलेली व्याख्या वाचल्यावर बहुधा शिक्षकाला नेमके काय म्हणावे हेच सुचले नसेल. विवाह का होतो आणि विवाह का केला जातो हे यात लिहिले गेले आहे. या व्याख्येनंतर शिक्षकाने विद्यार्थ्याला या प्रश्नाच्या उत्तरादाखल कुठलेच गुण दिलेले नाहीत. विवाह म्हणजे काय असा प्रश्न विचारण्यात आला होता. चिमुकल्या विद्यार्थ्याने स्वतःच्या बुद्धीनुसार विवाहाची अजब व्याख्या लिहिली आहे, यामुळे शिक्षक अधिकच भडकला आहे.
“ज्यावेळी मुलीचे पालक तिला, तू आता एक महिला असून यापुढे आम्ही तुला खाऊ घालू शकत नाही, जा आणि असा पुरुष शोध की जो तुला खाऊ घालेल अस सांगतात त्यावेळेस मुलगी विवाह करते. ती अशा एका पुरुषाला शोधते, ज्याला त्याचे पालक सातत्याने विवाह करून म्हणून ओरडत असतात आणि आता तरी पुरुषासारखा वाग अस सांगत असतात. त्यानंतर दोघे विवाह करतात आणि मुलांना जन्म देतात’’ अशा आशयाचा निबंध या तिसरीतील मुलाने लिहिला आहे.
हा विद्यार्थी इयत्ता तिसरीतील असल्याचे समजते. अशा लहान मुलांना विवाहाचा अर्थ विचारणे एकप्रकारे चुकीचे आहे. लहान मुलांना विवाहाचा नेमका अर्थ माहित असण्याची अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे मत सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.