नंदगड प्रतिनिधी – नंदगड येथील ग्रामपंचायत सदस्यांचे पंचायतीसमोर, धरणे आंदोलन सुरु आहे. गेल्या तीन महिन्यापासून भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेली नंदगड पंचायतीचा समस्या अजून हि संपली नाही. नुकतेच विज बिल न भरल्याने नंदगड गाव ६ दिवस अंधारात होते. त्यावेळीही भ्रष्टाचाराबाबत गावकऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्यांना व अध्यक्षांना धारेवर धरले होते. त्यानंतर हेस्कॉमचे बिल भरल्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. पंचायतीच्या 20 सदस्यांनी गेल्या तीन महिन्यापासून झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, म्हणून वरिष्ठापर्यंत लेखी निवेदन दिलेले आहे. मात्र या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात आली नसल्याने बुधवार पासून पंचायतीच्या सदस्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे . धरणे आंदोलनात उपाध्यक्षसह 19 पंचायत सदस्य सहभागी झाले आहेत. जोपर्यंत भ्रष्टाचाराची चौकशी होऊन सत्य समोर येत नाही, तोपर्यंत हे धरणे आंदोलन कायम सुरू राहील, असे पंचायतीचे उपाध्यक्ष या धरणे आंदोलनाच्या वेळी काही गावकऱ्यात व पंचायत सदस्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला .
Trending
- टी-20 वर्ल्ड कप २०२४ साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा!
- अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी दहा वर्षांची शिक्षा
- दहावीचा निकाल १० मे ला जाहीर होण्याची शक्यता
- भाजप संविधान बदलणार ही अफवा !
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ५ मे रोजी सावंतवाडीत प्रचारसभा
- 2 मे रोजी एकनाथ शिंदे, 3 रोजी अमित शहा बेळगावत
- तर तिलारीचे पाणी अडवू !
- “मला प्रियंका गांधींना विचारायचे आहे…”: सेक्स स्कँडल प्रकरणावर अमित शाह यांचा प्रियंका गांधी वर जोरदार हल्लाबोल