धारबांदोडा / प्रतिनिधी
धारबांदोडा पंचायत क्षेत्रात लंपी व्हायरसचे लागण झालेली गुरे आढळून आल्याचा संशय आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी लोकांकडून होत आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार 20 ते 25 गुरांना या व्हायरसचे लागण झाल्याचा अंदाज असून सध्या या गुरांना ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे .मात्र बेवारसपणे फिरणाऱया या गुरांना ताब्यात घेण्याचे आवाहन संबंधित यंत्रणे पुढे आहे.
धारबांदोडा तालुक्मयात सध्या बेवारस गुरे राष्ट्रीय व इतर रस्त्यांवर ठाण मांडून बसत असतात .यामुळे हा व्हायरस जर सर्वत्र पसल्ला तर मोठी खळबळ माजण्याची शक्मयता वर्तविले जात आहे.
हल्लीच धारबांदोडा पंचायतीने आपल्या पंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांना रस्त्यावर फिरणाऱया गुरांना आपल्या ताब्यात ठेवण्याचे आव्हान केले होते .या अनुषंगाने गोसेवा महासंघाने पंचायतीकडे संपर्क करून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुरे ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली आहे. महत्त्वाचे म्हणजे गुरे ताब्यात घेण्याची तयारी करण्यापूर्वी गौसेवक महासंघाने धारबांदोडा पंचायतीच्या कोण कोणत्या ठिकाणी किती गुरे बेवारसपणे ठाण म्हणून बसतात त्याची यादी पंचायतीला सादर केली आहे.
यासंबंधी बोलताना धारबांदोडा पंचायतीचे सरपंच विनायक गावस यांनी सांगितले की सध्या पंचायत क्षेत्रातील राष्ट्रीय व इतर रस्त्यावर दिवस-रात्र बेवारशी गुरे ठाण मांडून बसतात .त्यामुळे अपघात होऊन अनेक वाहन चालकांनी जीव गमावला आहे. शिवाय वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे .सध्या गोमंत गोसेवक महासंघाने पंचायतीकडे संपर्क करून गुरांना ताब्यात घेण्याची तयारी दर्शवली आहे .त्यानुसार पंचायतीने गुरांच्या मालकांना आवाहन करून गुरांचा योग्य प्रकारे सांभाळ करावा अशी मागणी केली आहे .जर गोसेवक महासंघाने गुरांना ताब्यात घेतल्यास त्याला पंचायत जबाबदार राहणार नाही असे ते म्हणाले. त्यातच गुरांना लंपी व्हायरसची लागण झाल्याने लोक चिंतेत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.