तेलंगणा येथून घेतले ताब्यात
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव-येथील होली स्पिरीट चर्चमध्ये 30 जून 2022 रोजी चोरी झाली होती. चोरटय़ाने सकाळी चर्चेमध्ये प्रवेश करत दीड लाखांची रोकड लंपास केली होती. या चोरी प्रकरणी फातोर्डा पोलीस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली होती. या चोरी प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी ऍलेक्स मॅथ्यू (39) याला तेलंगणा येथे अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेला ऍलेक्स मॅथ्यू हा मुळचा केरळ येथील असून फातोर्डा पोलीस त्याच्या मागावर होते. पोलिसांनी आरोपीकडून रोख रक्कम 53,500 रुपये तसेच चोरी करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त केले आहे. होली स्पिरिट चर्च चोरी प्रकरणात व्हिक्टर मिनेझिस यांनी पोलिसात तक्रार दिली होती. 30 जून 2022 रोजी सकाळी 6 ते 6.30 च्या दरम्यान ही चोरी झाल्याची तक्रारीत म्हटले आहे. अज्ञात चोरटय़ाने चर्चच्या मागच्या बाजूने पाद्रीच्या कक्षात शिरून कपाट फोडून रक्कम लंपास केली होती.
चर्चमधील सीसीटीव्ही कॅमेऱयावर या चोरटय़ाची छबी कैद झाली होती. फातोर्डा पोलीस याबाबत अधिक तपास करीत होते. त्याना या प्रकरणाचा तपास लावण्यात यश आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचा अन्य काही प्रकरणात सहभाग आहे का? याचा सद्या फातोर्डा पोलीस तपास करीत असल्याची माहिती निरीक्षक गिरेंद्र नाईक यांनी दिली.