बेळगाव प्रतिनिधी – ऐन दिवाळीमध्ये खंडग्रास सूर्यग्रहण आले आहे. सोमवारी नरक चतुर्दशी झाली आणि मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण आले. मंगळवारी बेळगावची बाजारपेठ पूर्णपणे खुली असते. शिवाय दिवाळीमध्ये तर सुट्टी रद्द करून व्यापारी विक्रेते दुकानदार आपले व्यवसाय सुरू ठेवतात. कोरोनाच्या कारणास्तव गेले दोन वर्षे सार्वजनिक स्वरूपात उत्सव करण्यावर निर्बंध आले होते. पण आता दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत असतानाच सूर्य ग्रहणामुळे उत्साहाला खंड पडला आहे ग्रहणात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. खरेदी केली जात नाही या कारणामुळेच मंगळवारी बेळगावची बाजारपेठ मोकळी झाली आहे. सायंकाळी सहा नंतर ग्रहण काल संपल्यानंतर दुकाने आणि अन्य व्यवहार सुरू होण्याची शक्यता आहे.
Trending
- माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
- अर्चना घारे – परब यांनी बजावला मतदानाचा हक्क
- राधानगरी तालुक्यात 27 टक्के तर शहरात सरासरी 32 टक्के मतदान
- खासदार संजय मंडलिक यांनी बजावला कुटुंबीयांसमवेत चिमगावमध्ये मताचा अधिकार !
- ओटवणे मतदान केंद्रावर सकाळपासूनच शांततेत मतदान
- Sangli : जिल्ह्यात सर्वत्र उत्साहामध्ये मतदानाला सुरवात; जाणून घ्या जिल्ह्यातील मतदान आणि त्याची टक्केवारी
- विशाल परबांनी सावंतवाडीतील बूथवर दिल्या भेटी
- अमेरिकेतून थेट सावंतवाडीत येत तिने बजावला मतदानाचा हक्क !