वृत्तसंस्था/ लंडन
आगामी होणाऱया बिली जिन किंग चषक सांघिक महिलांच्या टेनिस स्पर्धेतून माजी अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेती इमा राडूकेनूने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. सदर स्पर्धा ग्लॅस्गो येथे 8 ते 13 नोव्हेंबर दरम्यान होणार असून ब्रिटनला या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाली आहे.
या स्पर्धेमध्ये 12 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. हे संघ चार गटात विभागले जाणार आहेत. ब्रिटनची राडुकेनू हिला काही दिवसापूर्वी मनगटाला दुखापत झाली होती. या दुखापतीतून 19 वर्षीय राडूकेनू अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. गेल्या वर्षी तिने अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.