शिरोळ प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांची कोठ्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आली असून फसवणूक करणार्या मुकादमावर मोका सारखा कायदा लागू करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार संघटनेच्यावतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय यासह साखर संघ कार्यालयावर शनिवार ५ नोव्हेंबर रोजी वाहनांसह मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती राज्य ऊस वाहतूक दार संघटनेचे अध्यक्ष राजगोंडा सुरगोंडा पाटील व दिग्विजय जगदाळे यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली.
ते म्हणाले, साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी मजूर पुरवठा करणारे मुकादम राज्यातील अनेक ऊस वाहतूक मालकांना कोट्यावधी रुपयाचा गंडा घातला आहे यामुळे वाहनधारक आर्थिक अडचणीत सापडले आहेत . ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडी मालक मजूर पुरवठा करणाऱ्या मुकादमना ऍडव्हान्स रुपी पाच लाखापासून वीस रुपयापर्यंत नोटरी कराराच्या आधारे दिली जाते .. मात्र गेल्या काही वर्षापासून मुकादम व मजूर जाणूनबुजून षडयंत्र रचून सदर ट्रक, ट्रॅक्टर मालक यांच्याकडून खोटे मजूर करून बनावट कागदपत्रांच्या आधारे तर काही वेळा चुकीच्या रहिवाशी पत्त्याच्या आधारे लाखो रुपयांच्या मोठ्या रकमा उचल करून फसवणूक करून पोबारा करीत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे १ हजार वाहनधारकांची फसवणूक झाली असून फसवणूक करणार्या मुकादम व मजूरांवर मोका सारखा कायदा करून त्याची कडक अंमलबजावणी करावी, शासन स्तरावर ऊसतोडणी मुकादम, मजूर व वाहतूकदारं यांचे महामंडळ स्थापित करावे, ऊस वाहतूक शेतकर्यांना ट्रॅक्टर, ट्रेलर घेण्याकरिता पीककर्जाप्रमाणे सवलतीच्या व्याजदरात ५० टक्के अनुदान कर्ज मंजूर व्हावे, यासह अन्य मागण्यांसाठी वाहनासह मोर्चा काढण्यात ये