हरमल वार्ताहर
गोव्याच्या भूमीतील दुसरा विमानतळ हा पेडणे तालुक्मयातील मोपा गावात होत असल्याने पेडणेवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. अश्या भूमीत ज्यांचे बालपण गेले, ज्या तालुक्मयाचे नेतृत्व व पर्यायाने राज्याचे नेतृत्व केले, व 50 वर्षानंतरही त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो, ज्यांना गोव्याचे भाग्यविधाते म्हटले जाते अशा दयानंद उर्फ भाऊसाहेब बाळकृष्ण बांदोडकर यांचे नाव मोपा विमानतळाला देण्याचा एकमुखी ठराव मधलामाज येथील भाऊसाहेब बांदोडकर यांच्या उद्यानात धरणे कार्यक्रमात संमत केला. सदरच्या ठराव प्रा. गजानन मांदेकर यांनी वाचून दाखवला व उपस्थितांनी संमती दिली.
यावेळी मगो पक्षाचे माजी आमदार परशुराम कोटकर यांनी आजारी अवस्थेत उपस्थित राहून विमानतळाच्या नावासाठी पूर्ण पाठिंबा दिला. मांदे मतदारसंघाचे नेतृत्व करताना ते पहिले मुख्यमंत्री बनले, याचा सर्वांना अभिमान आहे. आमदार मंडळी गैरहजर असल्याने कोणीही राजकारण करू नये, आम्ही सर्वपक्षीय एकमताने भाऊसाहेब बांदोडकरांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करूया. मगो पक्षाचे नेते व मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पेडणे वासीयांच्या मागणीचा आदर करून भाऊसाहेब बांदोडकर नाव विमानतळाला आग्रह धरावा अन्यथा सरकारातून ताबडतोब बाहेर पडावे, बेगडी प्रेम दाखवू नये, असे आव्हान माजी आमदार कोटकर यांनी दिले.
राज्याच्या जडणघडणीत भाऊसाहेबांचा मोलाचा वाटा : ऍड. रमाकांत खलप
हिंदवी स्वराज स्थापनेच्या कार्यात छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होते तसेच गोवा राज्याच्या जडणघडणीत मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचा वाटा खूप मोला आहे. त्यामुळे त्यांचा कधीच विसर पडणार नाही, असे ते व्यक्तिमत्त्व आहे. या नामकरणासाठी पंचायत आदींना ठराव घेऊन मागणी पदरात पाडून घेऊया. उत्तर व दक्षिण गोव्यात हे आंदोलन नेऊया. पुढील वषी भाऊसाहेब बांदोडकर यांच्या महानिर्वाणास 50 वर्षे पूर्ण होत आहेत व त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय विमानतळ व स्मृतिनिमित्त भव्यदिव्य कार्यक्रम करण्यासाठी सहभागी होऊया, असे खलप यांनी व्यक्त केले.
मांडवी नदीत कॅसिनो व जुगारी संस्कृती सुरू केली त्या व्यक्तीचे नाव द्यावे की गोव्यात शैक्षणिक ज्ञानगंगा वाडय़ा वाडय़ावर सुरू करून सर्वांना शिक्षित केले, पोर्तुगीजांच्या गुलामगिरीमुळे मागास बनलेला गोवा विकसित केला त्या व्यक्तीचे नाव द्यायचे हा मुद्दा असूच शकत नाही. दुर्दैवाने दिल्लीतून मार्गदर्शन करणाऱया लोकांमुळे मुख्यमंत्री अपयशी व दुर्दैवी ठरले आहे. बांदोडकर यांच्या खाणीवर नोकरी करून मुख्यमंत्र्यांच्या वडीलानी मुख्यमंत्र्यांना शिक्षित केले, त्या डॉ. सावंत यांनी दोन्ही नावे पाठवण्याची भाषा करू नये, असे विनायक च्यारी यांनी व्यक्त केले. भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी तीन वर्षांपूर्वी सुभाष केरकर यांनी सुरू केली होती. ती मागणी रेटून घेण्यासाठी मांदे मतदारसंघातील प्रत्येक पंचायत समिती, ग्रामसभेत एकमताने ठराव घेण्याची सूचना निमंत्रक मांदेकर यांनी केली.
या कार्यक्रमात अमृत अगरवाडेकर, श्रीधर मांजरेकर, जनार्दन ताम्हणकर, शेतकरी संघटनेचे संजय बर्डे, दीप्तेश नाईक, उमेश तळावणेकर, मिलन वायगंणकर, तुषार टोपले, सुभाष केरकर यांची नामकरणास पाठिंबा दर्शवणारी भाषणे झाली. या धरणे कार्यक्रमाचे निमंत्रक प्रा. गजानन मांदेकर यांनी प्रास्ताविक व ठराव वाचून दाखवला. सुत्रनिवेदन व आभार विनायक च्यारी यांनी केले. प्रारंभी सुभाष केरकर यांच्याहस्ते भाऊसाहेब बांदोडकर यांच्या अर्ध पुतळय़ास पुष्पहार घालण्यात आला.